अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम शेत शिवारात एका खेचरने उन्माद माजविला असून शेतमालाची नासधूस करीत असल्याने शेतकऱ्याने वनविभागाकडे तक्रार केली. परंतू वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
अमळनेर तालुक्यातील निम शेत शिवारात एक खेचर उन्माद माजवला असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते आहे. याबाबत तरुणांकडून सोशल माध्यमातून गावातील व्हाट्सएप ग्रुपवर याबाबत सावधगिरी म्हणून शेतकरी बांधवांना सूचित केले आहे.हा (खेचर) घोडा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या शेत शिवारात अनेक शेतकऱ्याचा निदर्शनास आला आहे. तो शेतमालाची नासधूस करीत असल्याचा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या आहेत. परंतु वनकर्मचारी यांनी घोडा हा पाळीव प्राणी असून आमचा काही संबंध येत नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगून वर हात केले आहेत; त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय याला पांगविण्यासाठी गेल्यावर तो अंगावर धावून येतो तसेच चावा देखील घेत आहे. तो अनेक दिवसांपासून मोकाट असल्याने पिसाळलेला असावा हे देखील नाकारता येत नाही.यामुळे त्यास पकडण्यासाठी कुणीही धजावत नाहीये.या घोड्याचा(खेचर )तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी निम येथील शेतकरी बांधवांनी केली आहे.