गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूकी दरम्यान आय.डी.ई हल्ले करण्याच्या योजनेत माओवादयांनी टिपागड या भागात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरून ठेवली होती. या बाबतची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे तात्काळ शोध मोहिम पोलिसांनी राबविली होती.
मिळालेल्या माहितीच्या पोलिसांनी पाहणी केली. यात एका उंच डोंगरावर मोठ्याप्रमाणात स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने २ बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी-६० चे एक पथक, सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक आणि गरज पडल्यास हे स्फोटक नष्ट करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते. उर्वरित ३ क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. यावेळी पोलीस पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. या परिसरात आता पर्यंत एकुण ९आय.ई.डी. आणि ३ क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून नष्ट करण्यात आले आहेत.