मुंबई प्रतिनिधी । कासारा ते इगतपुरीच्या दरम्यान अंत्योदय एक्सप्रेसचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असली तरी जीवीतहानी टळली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास १२५९८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही जखमी झालेलं नाही. यातील सर्व प्रवासी सुखरूप असून मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. या अपघातामुळे मध्य रेल्वेवरची मुंबई नाशिक वाहतूक ठप्प झाली आहे. या एक्स्प्रेसमधले सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनाने दिली आहे.