औरंगाबाद (प्रतिनिधी) जागावाटपावरून मतभेद झाल्याने एमआयएमने प्रकाश आंबेडकरांसोबत काडीमोड घेतला होता. परंतू आता हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
लोकसभेतल्या कामगिरीने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत काही दिवसांपूर्वीच फुट पडली होती. जागावाटपावरून मतभेद झाल्याने एमआयएमने युती तोडली होती.परंतू आता हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांनी जर असादुद्दीन ओवेसी यांचा फोन उचलला तर पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येवू शकतात, असे सांगत खासदार इम्तियाज जलील यांनी त्याबाबतचे संकेत दिले आहेत.