धरणगावात स्वस्त धान्य दुकानदारांचे ‘ई-पॉस मशीन जमा करो’ आंदोलन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानादार संघटनेच्या वतीने धरणगाव तहसील कार्यालयात ‘ई-पॉस मशीन जमा करो’ आंदोलन करण्यात आले. याबाबत नायब तहसीलदार मोरे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे अरविंदकुमार ओस्तवाल यांनी ई पॉस मशीन यांची अंत्ययात्रा काढून मशीन जमा करण्याबाबत राज्य संघटनेने दिलेल्या आदेशाला आम्ही वळण दिले असून त्याची अंत्ययात्रा न काढण्याचा निर्णय घेतला. कारण आमच्या दुकानदार बांधव यांच्या उपजीविकेचे साधन हे ई पॉस मशीन असल्याने त्याची अंत्ययात्रा न काढता फक्त आंदोलन करून निवेदन देण्याचा मार्ग स्विकारला आहे.

या आहेत मागण्या –
१) इंटरनेट सर्वर सेवा व्यवस्थित पुरवून कायम स्वरुपी हे ४ जी मशीन चालले पाहिजेत, २) शासनाने धान्य दिलंय पण ह्या मशीन आणि सर्वर मुळे वाटप करता येत नाही, ३) महागाईच्या नियमानुसार प्रती क्विंटल ३०० रुपये कमिशन मिळाले पाहिजे, ४) सगळ्या योजनांचे धान्य व किट आदी एकच थंब ने सोबत निघाले पाहिजे, ५) ई केवायसी साठी आम्ही शासनाला मदत करीत आहोत पण सर्व्हरमुळे ते शक्य होत नाही तसेच प्रतिव्यक्ती ५० रुपये ई केवायसीसाठी शासनाने दिले पाहिजे, ६) लाभार्थी यांना वेळेच्या आत धान्य दिले गेले पाहिजे यासाठी जर सर्व्हर प्रॉब्लेम असाच असेल तर ऑफ लाईनची सुविधा विना अट कायम स्वरुपी ठेवण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

याप्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील, अमृत पाटील, सुधाकर पाटील, झवर काका पाळधी, रवि महाजन, ए.सी. पाटील, बाबुलाल पाटील, विनोद गुप्ता, स्वप्निल पाटील धानोरा, स्वरस्वती म ब गट बोरगाव, संजय भालेराव, प्रसन्न पाटील, एस जे पाटील, इच्छामाता म ब गट, एस. एल. पाटील, डी.पी. कोळी, लखीचंद पाटील गारखेडे, विकासो कल्याणे, म्हाळसाई म ब गट, आर.डी. पाटील निमखेडे, स्वामी समर्थ म ब गट उखळवाडी व गोंदेगाव, सिताराम ब गट, संतोष गुप्ता, महेंद्र चौधरी, अरुण देवरे, संजय गुप्ता, राजा परदेशी, चेतन पाटील भामर्डी, नंदलाल पाटील तर्डे, सावित्रीबाई म ब गट निशाणे, डी एस नन्नवरे, पी टी देवरे, मनूदेवी म ब गट आदी असंख्य दुकानदार व ग्राहक उपस्थित होते.

Protected Content