जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सात गुन्हेगारांवर बुधवार, 21 डिसेंबर रोजी हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील पिंप्राळा येथील गुन्हेगावर दोन वर्षासाठी तर सावदा व रावेर तालुक्यातील 6 गुन्हेगारांना एका वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम .राजकुमार यांनी दिले होते.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल पंडित सुनील दामोदरे, पोलीस नाईक रवींद्र पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यातील आरोपींच्या गुन्ह्याबाबतची माहिती मागून हद्दपारचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केला होता.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील रामानंद पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल भिका कोळी रा.पिंप्राळा जळगाव, यास दोन वर्षासाठी तर सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सय्यद इकबाल उर्फ सय्यद भुऱ्या अलाउद्दीन रा. रविवार, सावदा , शेख रईस उर्फ मास शेख इस्माईल रा. गाशिया नगर, सावदा, शेख जाबीर शेख खलील रा. ख्वाजानगर, सावदा, रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील विनोद विठ्ठल सातव रा.रावेर , तुळशीराम सुभाष सावळे रा. कर्जत ता.रावेर व निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुनील श्रावण चव्हाण रा. ऐनपुर ता. रावेर या सहा जणांना प्रत्येकी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किसनराव पाटील यांनी दिली आहे.