जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारी आदेश असतांना मेहरूण परिसरात लोखंडी सुरा घेवून परिसरात फिरणाऱ्या गुन्हेगारावर एमआयडीसी पोलीसांनी रविवारी २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई केली आहे. त्याच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आशुतोष उर्फ आशू सुरेश मोरे वय २१ रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव या गुन्हेगाराला १७ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. असे असतांना तो शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आशुतोष मोरे हा हातात लोखंडी सुरा घेवून फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी रविवारी २ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मेहरूण परिसरात कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.