ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार ! भारतीय न्याय संहिता आजपासून लागू; काय आहेत नवे बदल?

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात तीन नवे गुन्हेगारी कायद्यात बदल करण्यात आला आहे. हे तीन कायदे १ जुलै रोजी पासून लागू करण्यात आले आहे. या कायद्याची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भारताचे नविन कायदे जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हापेलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिखक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांच्यासह जिल्ह्यातील विधी महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

देशात तीन नवे गुन्हेगारी कायद्यात बदल करण्यात आला आहे. हे तीन कायदे १ जुलै रोजी पासून लागू करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता हे तीन नवे कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. हे तीन कायदे भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता,आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियम कायद्यांऐवजी लागू होतील. ब्रिटिशांच्या काळातलेच हे तीनही कायदे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लागू होते. त्यामध्ये काळानुरूप थोडेफार बदलही करण्यात आले होते. आताचे हे कायदे भारतीयांनी तयार केले असून, ते भारतीयांसाठीच आहेत. अशी माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली.

Protected Content