*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |* आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी वेळोवेळी मागण्या करुनही वाढीव मानधन तसेच कोवीड प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही. शासन प्रशासनाकडे थकीत मानधन प्रोत्साहन भत्ता व अन्य न्याय्य प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिकेसमोर आशासेविका आणि गटप्रवार्ताकांतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, आमच्या मागण्या मान्य न झाल्याचे पुढील काळात पाच दिवसांचा संप करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्यानी दिला आहे. केंद्र शासनाकडून भांडवलशाहीचे उदात्तीकरण केले जात असून कामगार विरोधी धोरण अंमलबजावणी केली जात आहे.
संसर्ग काळात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि गटप्रवर्तकाना वाढीव मानधन तसेच कोवीड प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही, या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या कर्मचाऱ्याना किमान २१ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात यावे, इमारत बांधकाम कामगारांना मुत्युलाभ, विवाह अनुदान, त्याच्या मुलांना विद्यावेतन, शेतमजुरांना किमान वेतन, मनरेगाची कामे सुरु करण्यात यावी आदि मागण्यासाठी सर्व असंघटीत कामगार, बांधकाम कामगार, शेतमजूर, यांचेसह आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी सेंटर इंडियन ट्रेड युनियन सिटू तर्फे मनपा समोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी कॉ. प्रवीण चौधरी, हनीफ शेख, विजय पवार, महेश कुमावत, रमेश मिस्तरी, अजीज खान, प्रवीण भूसनर, दिलीप सांगळे, नरेंद्रसिंग, ताराबाई महाजन, मंगला पाटील, चंदाबाई एकशिंगे, रेखाबाई कोळी आदी उपस्थित होते.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/503104058156679