Home राष्ट्रीय देशातील लोकशाही धोक्यात- सोनियांची टीका

देशातील लोकशाही धोक्यात- सोनियांची टीका

0
26


नवी दिल्ली वृत्तसंस्था । सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला आहे.

तीन राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचीची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात बोलतांना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या,देशातील लोकशाही सध्या संकटात आहे. मिळालेल्या बहुमताचा अत्यंत धोकादायक पद्धतीने गैरवार होत आहे. घातक अजेंडा राबण्यासाठी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांचा विचार चुकीचा अर्थ सांगितला जात आहे. तर केंद्र सरकार राजकीय सूड उगवण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर उतरले असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.


Protected Content

Play sound