पाचोरा प्रतिनिधी । येथील प्रागतिक विचार मंचतर्फे शहरात २५ ते २९ जानेवारीदरम्यान लोकशाही महोत्सव साजरा करण्यात येत असून यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
शहरातील टाऊन हॉल समोरील मानसिंगका ग्राउंडवर सायंकाळी ७ वाजता लोकशाही महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत. यात २५ जानेवारी रोजी जीवनाशी संघर्ष करणार्या अंध मुलांचा ममैफिल सुरांचीफ हा रश्रीं१४७ सुगम संगीत ऑर्केस्ट्रा चेतन उचीतकर आणि सहकारी (वाशीम) सादर करणार आहेत. २६ जानेवारी रोजी राजमती नाटकाचे सादरीकरण होईल. २७ रोजी रविवारी प्रश्न लोकांचे, उत्तरे लोकप्रतिनिधींचे हा अनोखा कार्यक्रम होणार असून यात आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ हे जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देतील. २८ रोजी आमदार बच्चू कडू यांचे प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप भ्रष्टाचाराचे कारण आहे, एक चिंतन या विषयावर बोलतील. तर २९ रोजी अमर हबीब यांचे शेतकर्यांच्या गळ्याचा फास बनलेले कायदे या विषयावर व्याख्यान होणार आहे. शहरातील नागरिकांनी याचा लाभ गेण्याचे आवाहन आयोजक सुनील शिंदे, प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष नितीन संघवी, नंदकुमार सोनार, अँड. अनिल पाटील, अजहर खान, प्रवीण ब्राम्हणे, सागर शेख, संदीप जगताप आणि अन्य सहकार्यांनी केले आहे.