जळगाव प्रतिनिधी । एरियाचा दादा असल्याचे सांगून चाकूने धाक दाखवत बांधकाम व्यवसायिकांकडून पैश्यांची लुबाडणूक करणाऱ्या एकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रामेश्वरलाल बंन्सीधर सैनी (वय- ४५) रा. राजस्थान, ह.मु. जिजाऊ नगर जळगाव यांचे अग्रवाल हॉस्पिटलजवळ बालाजी पॉवर टूल नावाचे तीन वर्षांपासून दुकान आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्यासुमारास दुकानावर असता राहुल सुरेश हटकर रा. हरीविठ्ठल नगर एका अनोळखी मुलासोबत आला. आणि रामेश्वरलाल या धमकावत ५०० रूपयांची मागणी केली. यावर सैनी यांनी नकार दिल्याने राहुल हटकरने शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत पैसे मागितले. सैनी यांनी घाबरून खिश्यातील २०० रूपये दिले. गेल्या आठदिवसांपुर्वी देखील घडला होता.
इतर लोकांनाही त्रास देणे सुरू होते
याच पध्दतीने संशयित आरोपी राहुल हटकर याने चाकूचा धाक दाखवत प्रकाश छत्रमल राठी रा. वाघनगर यांच्याकडून १ हजार रूपये, सुरेशकुमार सैनी यांच्याकडून ४ हजार रूपये, किशोर रामगोपाल प्रजापत यांच्याकडून १० दिवसांपुर्वी ४०० रूपये, जगदिश प्रसाद सैनी व छगन श्रीरामचंद्र सैनी यांना सुध्दा चाकूचा धाक दाखवून पैसे मागण्याची धमकी दिली. अशी वेगवेगळ्या नागरिकांकडून धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी ६ हजार १०० रूपये जबरीलुट केली आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा
रामेश्वरलाल सैनी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राहुल हटकर याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.