Home न्याय-निवाडा सावदा ग्रामीण रूग्णालयाला “राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज”नाव देण्याची मागणी

सावदा ग्रामीण रूग्णालयाला “राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज”नाव देण्याची मागणी


माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील ग्रामीण रूग्णालयाला “राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय” असे नाव देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शहरातील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी जळगाव येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावदा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या नावात बदल करून ” राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय ” असे नांव देणेत यावे यासाठी सावदा नगरपारिषदेत ठराव पारीत करण्यात आलेला आहे. तसेच रूग्णालयास नगरपरिषदेने जागा हस्तांतरण करण्याच्या वेळी ” राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय ” असे नांव देणेत यावे असे स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.  संदर्भीय पत्रानुसार दिनांक २८/१२/२०२२ रोजी आपले कार्यालयाकडे नांव देणेबाबत विनंती करणेत आलेली होती. त्या पत्रावर सावदा नगरपरिषदेने स्वयंस्पष्ट अहवाल सुध्दा दिलेला आहे. तरी सुध्दा आजपावेतो रूग्णालयास नांव देणे संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात योग्य कारवाई करून रूग्णालयात ” राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय ” असे नांव देण्यात यावे अन्यथा सावदा ग्रामीण रूग्णालयासमोर उपोषण करणार आहे असा इशारा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound