बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील लोकांनी पंतप्रधान आवास योजना नुसार घरकुल मंजूर झाल्यावरही घर न बांधता कागदपत्री रेकॉर्ड दाखवले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर व घरकुल चा लाभ घेणाऱ्यांवर चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिरसाळा येथील पुंडलिक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरसाळा येथील ग्रामसेवक संतोष करवते यांनी एकाच घरातील दोन लोकांना घरकुलाचा लाभ दिला. एवढेच नव्हे तर ज्यांचे पक्के घर आहे त्यांना सुद्धा घरकुलाचा लाभ दिलेला आहे. काही बहाद्दरांनी फक्त कागदपत्रे वर घर दाखवून घरकुलाचे चेक काढलेले आहेत. 2023/24/2025 मध्ये असे बोगस बनावट घरकुल बांधण्यात आलेले आहे.
परिणामी योग्य लाभार्थ्यांना लाभ न मिळता दुसऱ्यांनाच लाभ मिळतो त्यामुळे अशा घरकुलांची चौकशी होऊन संबंधित अधिकारी कर्मचारी व घरकुलाचा लाभ घेणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिरसाळा येथील पुंडलिक पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.