यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिन्दु धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम मंदिराचे नवनियुक्त पुजारी महंत मोहीत पांडे यांचे आक्षेपार्य पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल करणार्या अशा मनोविकृत विरूद्ध कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन फैजपुर विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांना देण्यात आले आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात युवकांनी म्हटले आहे की, अभय महाजन ञ( राहणार कोळवद तालुका यावल ) हा एका राजकीय पक्षाचा सोशल मिडीया प्रमुख आहे. या तरूणाने दिनांक १३ डिसेंबर रोजी संपुर्ण हिन्दु धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम मंदीराचे नवनियुक्त पुजारी महंत मोहीत पांडे यांच्याबद्दल अश्लील आक्षेपार्ह मजकुर चे पोस्ट स्वत:च्या फेसबुक प्रोफाईलवरून व्हायरल करीत हिन्दु धर्माच्या भावना दुखावल्याचे कृत केले आहे.
अशा विकृत प्रवृत्तीच्या तरूणा विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.