यावल( प्रतिनिधी) राज्यातील मातंग समाजाला एस.सी. प्रवर्गामधुन लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड. वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी येथे बहजन रयत परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की. राज्यातील मातंग समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या वतीने शासनाला अनेकवेळा मोर्चे व आंदोलने केले आहेत. तरीही शासनाने मातंग समाजाच्या आरक्षणाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले आहे. अनुसूचित जातीचे जे काही १३ टक्के आरक्षण आहे, त्या आरक्षणातुन मातंग समाजाला लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, या मागणी करीता सातत्याने पाठलाग करूनही शासन दूर्लक्ष करीत असल्याने राज्यातीत बिड जिल्हातील साळेगाव (ता.केज) येथील मातंग समाजाचे तरुण संजय ताकतोडे यांनी बिडच्या बिंदुसरा या तलावात जलसमाधी घेवुन आपली जिवनयात्रा संपवली. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचा हा बळी असुन त्याचे बलिदान हे व्यर्थ जाऊ नये, असे जर राज्य शासनाला वाटत असेल तर मातंग समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. अन्यथा मातंग समाजाच्वा भावनाच्या उद्रेक होईल, असा इशारा आपला निवेदनाव्दारे सुरेश गडबड नेटके, चंदु समाधान वैराळे, श्रावण जगन सुरळकर, रमेश मोरे, सचिन सुधाकर विकाळजे आदींनी दिला आहे.