अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसला धरणगाव येथे थांबा मंजूर

673f6ada d4a6 4844 9666 15578db26f08

धरणगाव (प्रतिनिधी) खा.ए.टी.पाटील यांच्या प्रयत्नाने धरणगाव येथे अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसला थांबा मंजूर झाला आहे. सदर गाडी आठवड्यातून चार दिवस आवागमन करणार आहे. धरणगाव येथून अहमदाबादकडे जाण्यासाठी रात्री १०.०० वाजता बुधवार, शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी तसेच नागपूर मार्गे पुरीकडे जाण्यासाठी सकाळी ३.०० वाजता सोमवार, मंगळवार, शुक्रवार व रविवार या रोजी ही गाडी उपलब्ध राहील.

दि.३ जानेवारी २०१९ रोजी खा.ए.टी. पाटील यांचेसोबत तालुका प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष महेंद्रशेठ कोठारी, सदस्य-एस.डब्ल्यू पाटील, दिनकर पाटील, किरण वाणी, सुशील कोठारी, आनंद बाचपाई, पुनिलाल महाजन, नगर परिषद गटनेते कैलास माळी यांनी ना.पियुष गोयल यांची भेट घेतली होती. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Add Comment

Protected Content