अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील काही गावातील ग्रामपंचायतींच्या विहिरींवरून तालुक्यातील अन्य गावांना सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. पण येतील विहिरींची पाणीपातळी कमी होत चालल्याने पांझरा नदीत पाण्याचे आवर्तन त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी १२ ग्रामपंचायतींनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी म्हटले आहे की, पांझरेतून त्वरित आवर्तन न मिळाल्यास दोन दिवसांनी ग्रामपंचायतींच्या विहिरीतून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. धुळे जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.