Home Cities चाळीसगाव उज्जैन येथील घटनेच्या निषेधार्थ कडक कारवाईची मागणी

उज्जैन येथील घटनेच्या निषेधार्थ कडक कारवाईची मागणी

0
30

चाळीसगाव प्रतिनिधी । उज्जैन येथील अजमेर शरीफ बाबांबद्दल जितेंन्दारानंदने अपशब्द वापरल्यामुळे मुस्लिम बांधवांचे भावना दुखावल्याने गुन्हा नोंदवून कारवाई व्हावी, या आशयाचे निवेदन शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मुस्लिम बांधवांकडून देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, अजमेर शरीफ हजरत ख्वाजा मोहीयोद्धीन चिश्ती रजि. तआला अनहू यांच्याबद्दल साधू जितेंन्दारानंद नामकने घाण शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे  देशात हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील भाविकाचे भावना दुखावल्या आहे. सदर साधुवर गुन्हा नोंदवून कडक कारवाईची मागणी मागणी नगरसेवक फकिरा मिर्झा, लतीफ भाई, सोयफ शेख, सलमान सर, बिलाल मिझावर, अझर काझी, अलि बिल्डर व शेख इम्रान आदींनी केली आहे.

 


Protected Content

Play sound