सावदा प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकवर्गणीतून कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी सावदा येथील राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक रहिवाशी यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक रहिवाशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावदा व परिसरात कोरोनाचे रूग्ण अधिक प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे. त्यात बाधित रूग्णांची संख्या अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. रूग्णांना उचारासाठी वणवण फिरावे लागत असून रूग्णांसह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावदा शहरात ५० खाटांचे कोवीड रूग्णालय सुरू करावे किंवा स्थानिक रहिवासी लोकवर्गणीतून कोवीड सेंटर उभारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर राजेंद्र चौधरी, विनोद नेमाडे, मनिष भंगाळे, सुभाष माळी, यशवंत वाघुळदे, विशाल कोळी, सागर चौधरी, सागर पाटील, प्रकाश नेमाडे, विवेक भंगाळे, रविंद्र नारखेडे, शेख अजिज शेख खालीक धनराज चौधरीख् राजेश माळी, नितीन भिरूड, अतुल नेमाडे, अनिल चौधरी आणि राजेंद्र माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.