जळगाव प्रतिनिधी । गिरणा धरणाचे सुटलेले आवर्तनाचे पाणी चोरगाव ता. धरणगाव आणि नांदगाव ता. जळगावपर्यंत येण्यासाठी गिरणा परीसरातील नांद्रा, रेल, लाडली, चांदसर, कवठड, चोरगाव, फेसर्डी, पिलखेडा या गावातील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील चोरगाव आणि जळगाव तालुक्यातील नांदगाव या दोन गावांसह नांद्रा, रेल, लाडली, चांदसर, कवठड, फेसर्डी पिलखेडा या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे.
या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी नदी लगत असल्याने आता नदीत पाणी नसल्याचे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या गिरणा नदीला सोडलेले आवर्तन हे चोरगाव आणि नांदगाव पर्यंत पोहचल्यास येत्या तिन महिन्यापर्यंत पाण्याची टंचाई भासणार नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबत सर्व गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा केले असता त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा टंचाईचा मंजूर आराखडा आणा तर पाणी सोडण्याचे आदेश मला देता येईल असे सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जिल्हा परीषदेत नागरीकांना पाठविले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित नसल्याने उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी सर्व शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली. याबाबत दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्यासह पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
पहा । नागरीकांच्या समस्या मांडतांना शेतकरी बांधवाना