भडगाव येथे निवडणुकीसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

106fbe02 eda6 462e 9296 002e463a96bc

 

भङगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवङणुकीसाठी मतदान अधिकारी, कर्मचार्यांना निवङणुक विभागामार्फत ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंञांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. येथील यशवंतनगर भागातील पुनम पवार विदयालयात दि. १३ ते दि. १५ असे तीन दिवस ई व्ही एम व्ही व्ही पॅट यंञ हाताळणीबाबत हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पङला. भङगावचे तहसिलदार गणेश मरकङ, नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी कर्मचार्यांना ई.व्ही.एम. आणि व्ही.व्ही. पॅट यंत्रे कशी हाताळावी, यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले.

तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक व सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना निवङणुक प्रशासना मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यातील एकुण १०५३ कर्मचार्यांनी घेतला. हे प्रशिक्षण तीन टप्यात घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासकीय आय.टी.आय.चे तज्ञ प्राध्यापक, भुमी अभिलेख कार्यालयाचे सोनवणे, नगर परीषदेचे कर्मचारी पवार, महसुल विभागाचे लिपीक राहुल नवगीरे आदिंनी विशेष सहकार्य केले. लोकसभा निवङणुकीसाठी निवङणुक यंञणा सज्ज आहे, अशी माहिती नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दिली.

Add Comment

Protected Content