धरणगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांनी प्रदेश काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज केले होते. त्यानिमित्ताने माजी मंत्री शोभा बच्छाव व ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे हे मुलाखती घेण्यासाठी आलेले होते.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून चंदन दिलीपराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी सर्वानुमते मागणी करण्यात आली. चंदन पाटील यांच्या निमित्ताने युवकांना संधी द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ललिता पाटील, प्रदेश सचिव डी. जी. पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष योगेश महाजन, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, सुरेश अण्णा भागवत, डॉ. गोपाल पाटील, रामभाऊ अण्णा पाटील, मंगल अण्णा पाटील, चंद्रकांत बागुल, विजय जनकवार, अनंत जाधव, बाबा देशमुख, रामचंद्र महाजन, मनोज कंखरे, बाळू पाटील रोटवद, वैभव पाटील, दिनेश भदाणे, सुभाष सांडू पाटील, शिवाजी पाटील, भरत पाटील, जगन्नाथ निकम, नानू बागुल आदी सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी चंदन पाटील यांच्या नावाची शिफारस केली व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.