जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सात महिन्याच्या लहान बालकाचा खराब गर्भ धार्मिक रितीरिवाजा नुसार नेरी नाका येथील कबरीत दफन करण्यात आला होता. तो दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आढळून आला नसून तो मृतदेह चोरीला गेला. याबाबत सदर प्रकरणी गुन्हा नोंद करून सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी लेखी तक्रार मंगळवारी २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांना दिली आहे.
सात महिन्याच्या गर्भाच्या मृतदेहाची चोरी प्रकरणी करीम शेख ताज मोहम्मद यांनी ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जळगाव शहरातील विविध संघटनाचे कार्यकर्ते यांनी फारुक शेख यांच्या नेतृत्वात प्रभारी पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर हकीकत समजून सांगितली. या प्रकरणी दवाखान्यात बाळ जन्माला आल्यापासून त्याचे दफनविधी करेपर्यंत सहभागी व रात्री प्रवेश केलेल्यांची सविस्तर चौकशी करून गुन्हेगार उघडकीस आणून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जा द्वारे करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी तक्रार अर्ज सादर करताना कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद सय्यद अमीर, जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष तथा मुस्लिम कब्रस्तान चे सचिव फारुक शेख, सहसचिव अनिस शाह, संचालक ताहेर शेख तसेच कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर सिकलगर, अपंग संघटनेचे मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.