पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा नगर परिषदेतर्फे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना शासनातर्फे जी आर्थिक मदत (कर्ज) देण्यात येणार आहे. त्या योजनांमध्ये रिक्षाचालकांना सुद्धा समावेश करण्यात यावा. या मागणीसाठी शहरातील एकता अॅटो रिक्षा चालक मालक युनियनतर्फे पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी एकता ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे एकनाथ सदनशिव, सुनिल शिंदे, सुधाकर महाजन, अनिल लोंढे, गणेश पाटील, अशोक निंबाळकर व रिक्षा चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.