Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

0
25


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर सात ते आठ जणांनी अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघातर्फे पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांना देण्यात आले.

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीला गावातीलच ५ ते ६ मुलांनी अचानकपणे उचलून नेत शेतात घेऊन गेले व तेथे त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत त्या मुलीवर जोर, जबरदस्तीने अत्याचार केले व ही हकीकत कुणालाही सांगीतल्यास याद राख अशी धमकी देऊन सकाळी तिन वाजेच्या सुमारास त्यांनी तिला महिलांच्या शौचालयाजवळ सोडून देत तेथुन पळ काढला या माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यापासून परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पंचक्रोशीतील गावातून व महाराष्ट्रभरातून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

या घटनेची दखल घेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी तिव्र शब्दात निषेध केला असून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली आहे. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष उत्तमराव दौलत मोरे, राज्य सदस्य धनराज पवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, मनोज पवार, ईश्वर अहिरे, रमेश पवार, गोवर्धन जाधव, समाधान लोखंडे, आय. एस. अहिरे, लता अहिरे, विनोद अहिरे, वरखेडी येथील समाजसेवक फकिरा गांगे, दिलीप आहिरे, मिलिंद अहिरे, विनोद खरे, नितीन तायडे, वसंत वाघ, राजु सावंत अशा जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देऊन आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.

ही मागणी करतांना पिडीत मुलीस व तीच्या परिवारास त्वरित मदत मिळवून द्यावी, गुन्ह्याची सखोल व काटेकोरपणे चौकशी होऊन आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी, हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात, कठोर म्हणजे मरेपर्यंत जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली असून तपासात दिरंगाई केल्यास आम्ही राज्यभरातून तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला आहे.


Protected Content

Play sound