Home Cities जळगाव रामेश्वर कॉलनीत बगीचा, जॉगिंग ट्रॅकची मागणी ; नागरिकांचे आमदारांना निवेदन

रामेश्वर कॉलनीत बगीचा, जॉगिंग ट्रॅकची मागणी ; नागरिकांचे आमदारांना निवेदन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या भागातील गट नं. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालिका, जळगाव) येथे जॉगिंग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका आणि लहान मुलांसाठी खेळण्याची सोय आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत रामेश्वर कॉलनी आणि परिसरातील नागरिकांनी एकत्रितपणे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, जळगाव-छत्रपती संभाजी नगर महामार्गालगत असलेल्या मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी, महादेव मंदिर परिसर आणि मेहरूण गावठाणच्या जवळपास नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, अभ्यासिका तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा आणि खेळणीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या समस्यांचा विचार करून रामेश्वर कॉलनी व परिसरातील नागरिकांनी आमदार महोदयांना विनंती केली आहे की, मौजे मेहरूण येथील गट क्र. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालिका जळगाव) येथे नागरिकांनी लोकसहभागातून वृक्षवाटिका तयार केली आहे. या जागेवर आमदार निधीतून जॉगिंग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका आणि लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधा दिल्यास परिसरातील नागरिकांची मोठी सोय होईल आणि ते आमदार महोदयांचे आभारी राहतील.

या मागणीसाठी रामेश्वर कॉलनी व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते, ज्यात मिराबाई पडळकर, कल्पना ढाकणे, रोहिणीताई कुलकर्णी, सिंधुबाई मांडोळे, विजया मांडोळे, हर्षल वाणी, संदीप मांडोळे, गणेश पाटील, अविनाश पाटील, डी. आर. पाटील, अशोक कोष्टी आदींचा समावेश होता. आता आमदार महोदय या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound