एरंडोल प्रतिनिधी । येथील तहसिल कार्यालयच्या आवारात भारतीय संविधान उद्देशिकेसिय सह संविधान स्तंभ उभारण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन व्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करणेत आले आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची स्वंतत्र राज्यघटना अस्तित्वात आली. देशाच्या या सर्वोत्तम कायदा व घटनेने सर्वांना स्वातंत्र्य अधिकार दिले. त्याच बरोबर सर्वात मोठी लोकशाही प्रधान संविधानिक राष्ट्र म्हणून हा देश पुढे आला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्य घटना लिहिली. प्रत्येक भारतीयाला मूलभूत अधिकार आणि हक्क मिळाले. यांची माहिती व महत्व समजावे म्हणून संविधान नवीन पिढीला माहिती व्हावी .त्यामध्ये राष्ट्र प्रेम निर्माण व्हावे , एकात्म बंधू भाव आणि समान तेचे मूल्य तरूण पिढी मध्ये रूजावेत यासाठी एक राष्ट्रीय संविधानिक प्रतिक म्हणून यासाठी आपल्या एरंडोल कार्यालय आवारात भारतीय संविधान उद्देशिकेशिय सह संविधान स्तंभ उभारण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, नासिक विभागीय महसूल आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी भाग एरंडोल यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद बेहेरे, सिताराम मराठे, गजानन पाटील, सुनील खोकरे, मन्सूर पठाण इत्यादीच्या सह्या आहेत.