जळगाव प्रतिनिधी । जागतिक भ्रष्टाचा विरोधी दिनानिमित्त जळगाव महापालिकेतील भ्रष्टाचार निर्मूलन करावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघातर्फे आयुक्त सतिश कुळकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज जागतिक भ्रष्टाचा विरोधी दिन आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतच्याविविध विभागांगमध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भात नागरीकांसह विविध संघटनांनी निवेदने दिली आहे. तसेच वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये देखील सातत्याने मालिकाच सुरू केली आहे. तरीही विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विभाग प्रमुख हे भ्रष्टाचार करीतच असल्याचे दिसून येत आहे. अश्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या लेखी व तोंडी तक्रारी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. तसेच जिल्हा प्रशासनाप्रमाणे महापालिकेतही भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करण्यात यावी जेणे करून महापालिकेत भ्रष्टाचारास आळा बसण्यास मदत होईल.
या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मुकुंद सपकाळे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, भारत ससाणे, भारत सोनवणे, विकास वाघ, किरण ठाकूर, अमेय कुळकर्णी, निरंजण पाटील, विक्की पाटील, भैय्या पाटील, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.