Home Cities एरंडोल एरंडोल येथील रस्त्यांवर मुरुम व कच टाकण्याची मागणी

एरंडोल येथील रस्त्यांवर मुरुम व कच टाकण्याची मागणी

0
26


एरंडोल प्रतिनिधी । येथील प्रभाग १ मधील नवीन वसाहतीत कच्च्या रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये मुरुम व कच टाकावे, अशी मागणी नगरसेविका वर्षा शिंदे यांनी एरंडोल नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात त्यांनी माझ्या प्रभगातील सर्व नवीन वसाहतीत जवळपास सर्वच कच्चे रस्ते आहेत.नवीन वसाहतीमध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पावसाळयात अनेक ठिकाणी खडयांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना ‘ चिखलामध्ये ये – जा करणे कठीण होवून जाते तरी चिखलामुळे रस्त्यावर भविष्यात काही दुर्घटना होवू नये म्हणून रस्त्यांवरील खड्डयांमध्ये मुरुम किंचा कच टाकण्याची व्यवस्था करावी मागणी करण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound