जळगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये कायमस्वरूपी टेक्निकल अधिकारी यांची नियुक्ती करण्यासंदर्भात येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील गावांचा महात्मा गांधी राष्ट्रीया रोजार हमी योजनेत समावेश आहे. संबंधित कार्यालयात तालुक्याहून आलेल्या ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र अधिकारी पुर्ण वेळ नसल्याचे अनेकांची कामे रखडले आहे. तालुक्यातील घरकुल योजनेअंतर्गत एमआरजीएस या योजनेतून जो निधीत संबंधितांना दिला जातो तो सुद्धा वेळेवर लाभार्थ्यांना मिळत नाही त्यामुळे संबंधित लाभार्थी हिरमोड होऊन त्यांना आर्थिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे.
तसेच संबंधित टेक्निकल अधिकारी हे नेहमी गैरहजर असतात त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे ही प्रलंबित असतात माझ्या माहितीनुसार स्थानिक नागरिकांना संबंधित टेक्निकल ऑफिसर यांची पं.स.गटविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली आहे. संदीप पाटील रा.बोने ता.धरणगाव जि.जळगाव यांनी सांगितले आहे. तसेच संबंधित गट विकास अधिकारी हे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन ते सांगतात की मला व संबंधित टेक्निकल ऑफिसर यांना दोन दोन ठिकाणी कामे करावी लागतात तसेच संबंधित अधिकारी हे पाच दिवस भुसावळ येथील पंचायत समिती कार्यालयात असतात व फक्त एक दिवसासाठी धरणगाव येथे येत आहेत व त्यात सुद्धा संबंधितांना उडवा उडवीची उत्तरे देऊन निघून जातात तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती की संबंधित तालुक्यातील ग्रामस्थांनी होणारी अडचण लक्षात घेता संबंधित पंचायत समिती धरणगाव येथे नवीन कायम टेक्निकल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून संबंधित ग्रामस्थांना आपली कामे वेळेवर करता येतील. या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिलहाध्यक्ष राजेंद्र निकम, गोविंदा जाधव, गणेश नेरकर, विशाल कुमावर, संदीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.