नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील रोहिणी सेक्टर 11 मध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाचा पाठलाग करून तब्बल १७ वेळेस गोळ्या झाडल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे हत्येच्या प्रयत्नाचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मनीष नामक तरुण आपल्या स्विफ्ट कारने जात असताना मागून येणाऱ्या गाडीने त्याला ओव्हरटेक करुन थांबवले. त्यानंतर गाडीतील हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी मनीषने गाडीतून उतरुन पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला. मनीषवर झालेला हल्ला जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मनीष जमिनीवर पडल्यानंतर एका हल्लोखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे.