बंगळुरू वृत्तसंस्था । यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरू संघाने आज पुन्हा एकदा सामना गमावला असून दिल्लीने त्यांना पराभूत केले.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुला १४९ धावांवर रोखलं. तर बंगळुरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसर्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एबी डिव्हीलियर्स, मार्कस स्टॉयनिस ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मोईन अलीच्या साथीने विराट कोहलीने फटकेबाजी केली. मात्र कगिसो रबाडाने एकाच षटकात ३ फलंदाजांना माघारी धाडत बंगळुरुला पुन्हा धक्का दिला. अखेरीस बंगळुरुला १४९ धावांपर्यंत मजल मारला आली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४, ख्रिस मॉरिसने २ बळी घेतले. तर अक्षर पटेल आणि संदीप लामिच्छानेने प्रत्येकी एक बळी घेतला.