गद्दारीमुळे लोकसभेत पराभव, विधानसभेत सावधान राहणार : निरीक्षक भास्कर काळे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून, आमच्याकडे सक्षम उमेदवारही आहे.लोकसभेत गद्दारीमुळे पराभव झाला असला तरी येत्या विधानसभेत आम्ही सावधान राहणार आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा निरीक्षक भास्कर काळे यांनी केले.

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये रावेर विधानसभेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पक्ष निरीक्षक श्री. काळे बोलत होते. माजी आ. अरुण पाटील म्हणाले, “महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यातून भुईसपाट होईल.” लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण जनतेपर्यंत जाऊन लोकांची कामे करावी. राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे आणि लोक आपल्याला मतदान करण्यासाठी निवडणुकीची वाट बघत आहेत.”

राष्ट्रवादीचे नेते श्रीराम पाटील यांनी सांगितले की, “गद्दारीमुळे मी रावेर मधून मागे राहिलो, पण शरदचंद्रजी पवार यांच्या लक्षात आले आहे. आगामी विधानसभेत जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पाच जागा शंभर टक्के निवडून येणार आहेत.”

बैठकीस जिल्हा कार्यध्यक्ष शालीग्राम मालकर, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, युवक तालुकाध्यक्ष मंदार पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन पाटील, शहराध्यक्ष महेमुद शेख, बाजार समिती संचालक राजू ठेकेदार, डॉ. शब्बीर शेख, सुनील कोंडे, माजी प. स. सदस्य दीपक पाटील, योगीता वानखेडे, ओबीसी तालुकाध्यक्ष देवानंद पाटील, उपशहराध्यक्ष आर. डी. वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Protected Content