एरंडोल प्रतिनिधी I जळगावच्या दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे एरंडोलमध्ये गुरुवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमाला सुरु होत आहे.
स्व.के एम महाजन, स्व.डॉ.ब.तु.राठी, स्व.डॉ.अनिल महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ दीपस्तंभ फाऊंडेशन, आर्यन फाऊंडेशन, विवेकानंद केंद्र एरंडोल, योगेश्वर नागरी सह. पतसंस्था, राठी हॉस्पिटल एरंडोल यांच्या सयुंक्त विदयमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यंदा व्याख्यानमालेचे १४ वे वर्ष आहे.
अहमदनगरचे सुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे हे ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रथम पुष्प गुंफणार आहेत.’’जीवन सुंदर आहे’’ या विषयावर ते बोलणार आहेत. द्वितीय पुष्प मुंबईच्या सुप्रसिद्ध वक्त्या, निवेदिका, मुलाखतकार अनघा मोडक या १० डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता गुंफणार आहेत.’’तिमिरातून तेजाकडे ‘’(अचानक अंधत्व आलेल्या जिद्दी मुलीचा प्रवास ) या विषयावर त्या प्रेक्षकांशी सवांद साधणार आहेत. तृतीय पुष्प प्रसिद्ध बुकलेट गाय अमृत देशमुख हे ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता गुंफणार आहेत. ”वाचन व व्यक्तिमत्व विकास” या विषयावर ते बोलणार आहेत..
तीनही व्याख्यान हे रा.ति.काबरे विद्यालय, एरंडोल येथे संपन्न होणार आहेत. सदर व्याख्यानमालेस दादासो दि.श.पाटील महाविद्यालय व रा.ति .काबरे विद्यालय यांचे सहकार्य लाभत आहे. विदयार्थी, पालक व शिक्षकांकरिता ही खास वैचारिक मेजवानी असणार आहे. तेव्हा या व्याख्यानमालेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन दीपस्तंभ व्याख्यानमालेचे समन्वयक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.