जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सामाजिक कार्यकर्ते अभियंता दीपकसिंग राजपूत यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन समाजाच्या विविध प्रश्नांना मार्गी लावण्याबाबत चर्चा केली.
राजपूत समाजाचे युवा नेतृत्व इंजीनियर दिपकसिंग राजपूत यांनी दिल्ली येथे केंद्रीय कॅबिनेट जलशक्ती मंत्री तथा राजपुत समाजाचे प्रभावशील नेते गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विविष विषयावर चर्चा करण्यात आल्या. या मध्ये मुख्य विषय हा महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या महाराष्ट्र सरकारला असलेल्या मांगण्या सविस्तर पधतीने मंत्री महोदयांना सांगण्यात आल्या तसेच लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सरकार कडून समाजाच्या संपूर्ण मांगण्या पूर्ण करुन दयाव्यात अशी विनंती इंजिनिअर दिपकसिंग राजपूत यांनी केली.
या चर्चेत मंत्री महोदयांनी सर्व मागण्या रास्त असून त्या लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्गी लाऊ असे आश्वासन दिले असल्याची माहिती दीपकसिंग राजपूत यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.