यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल गावाचे रहिवासी तथा यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दिपक नामदेव पाटील यांची अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य जनसंपर्क मंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुर्जर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयसिंह गुर्जर आणि गंगाराम गुर्जर यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन चौधरी यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.
दिपक पाटील यांच्या समाजहितासाठीच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी, विलास चौधरी, संचालक उज्जैनसिंग राजपूत, तसेच पत्रकार अरुण पाटील व समाजातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.