यावल ( प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयात तालुका तलाठी संघाची बैठक फैजपूर विभागीय उपाध्यक्ष आर.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्वानुमते तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला यावल तालुक्यातील मंडळ अधिकारी तसेच तलाठी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यात यावल तालुका अध्यक्षपदी हिंगोणा येथील तलाठी दीपक गवई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती एल.के.राणे व कार्याध्यक्षपदी के.के. तायडे यांची सुद्धा निवड करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे महसूल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये दीपक गवई यांना उत्कृष्ट तलाठी म्हणून या सन्मानाने सपत्नीक जिल्हाधिकारी डॉ.आविनाश ढाकणे व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले होते. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव जिल्हा सरचिटणीस जे.डी.बंगाळे. एस.टी.जगताप, एन.जे.धांडे. गोपाळ भगत. शरद पाटील यांनी तलाठी संघाच्या वतीने त्यांच्या महसुली कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.