जळगाव राहूल शिरसाळे । ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने व ना. एकनाथराव शिंदे यांच्या प्रयत्नांनी शहरवासीयांसाठी आयसीयू रुग्णवाहिकेचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयात लोकार्पण करण्यात आले.
ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात ३० आयसीयू रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येत आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी एक अँब्युलन्स मिळाली असून आज शिवसेनेच्या कार्यालयाजवळ याचे लोकार्पण राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर सुनील महाजन, मंगला बारी, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/332273371333636