एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आरोग्यविषयक उपकरणांचे लोकार्पण

जळगाव प्रतिनिधी |  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला १४ ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर व २१ बायपॅप मशिन्सचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोव्हीड-१९ ह्या आजाराने थैमान घातले आहे.  ह्या आजारामुळे लाखोंच्या संख्येने जनतेला आपले प्राण गमवावे लागले आहेत.  यात विशेषतः ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळेच जास्त प्रमाणात रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा व त्यामुळे गेलेले निष्पाप जीव, ही संपूर्ण परिस्थिती पाहून अमेरिकेत स्थायिक असलेले आपल्याच भागातील व्यावसायीक प्रमोद अत्तरदे यांनी आपल्या मातृभूमीत एवढी विदारक परिस्थिती निर्माण झालेली असतांना आपण काहीतरी करायला हवं, ह्या उदात्त भावनेने प्रेरित होऊन आपल्या काही समविचारी मित्रांच्या सहकार्याने १४ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच २१ बायपॅप मशीनची खरेदी करून अत्तरदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या भारताला अर्थात जळगावी उपलब्ध करून दिले आहेत.          

ह्यासाठी ह्या संकल्पनेचे प्रमुख व ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय कोल्हे यांनी सुनील भंगाळे व  मनोज चौधरी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने पाठपुरावा करून  ह्या उपकरणांचा लोकार्पण सोहळा घडवून आणला आहे. सदर उपकरणांचा लोकार्पण सोहळा लोकनेते एकनाथराव खडसे  यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक १ सप्टेबर २०२१ रोजी दुपारी ठीक ३ वाजता केमिस्ट भवन, जळगांव येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर सेवा ही स्व. आय.पी. अत्तरदे सर व स्व. निखिल एकनाथराव खडसे ऑक्सिजन कान्सेंट्रेटर व वायपॅप मशीन सेवा ह्या नावाने देण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी सदर लोकार्पण सोहळयास उपस्थीत राहून कार्यक्रमास शोभा आणावी असे आवाहन प्रकल्प प्रमुख जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष  सुनील भंगाळे व धनंजय कोल्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 

Protected Content