चाळीसगावात गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

चाळीसगाव, प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आ. मंगेश चव्हाण यांच्यातर्फे मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या हस्ते चाळीसगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये करण्यात आले. 

 

कोरोनाचा वाढता प्रकोप व माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आ. मंगेश चव्हाण यांनी मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका येथील महात्मा फुले आरोग्य संकुल अर्थात कोविड केअर सेंटरला उपलब्ध करून दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण ट्रामा केअर सेंटरला करण्यात आले. सदर अत्याधुनिक रुग्णवाहिका हि चाळीसगाव तालुक्यातील जनतेला मोफत सेवा बजावणार आहेत. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे रूग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी स्वरूपाच्या बिलावर आळा बसणार आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना आ. राजुमामा भोळे यांनी सांगितले की, सेवा ही संघटना हा विचार घेऊन कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीच पडत नाही कारण तो जमिनीवर राहून काम करतो, त्यामुळे सत्ता असो वा नसो काही फरक पडत नाही. राज्याचे नेते गिरीष महाजन यांचे आरोग्य क्षेत्रातील काम सर्वाना परिचित आहे म्हणून अश्या या लोकनेत्याचा वाढदिवस कोरोना रुग्णांची, जनतेची सेवा करून जिल्हाभर साजरा केला जाणार आहे. तसेच पुढे बोलताना आ. मंगेश चव्हाण यांनी अत्याधुनिक अशी कार्डियाक रुग्णवाहिका गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुक्याला भेट दिल्याने गरजू रूग्णांना त्याचा फायदा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्यांचे स्वागत करतो असे प्रतिपादन आ. राजुमामा भोळे यांनी केले. नियमांचे पालन करून यावेळी लोकार्पण सोहळा पार पडला.

 

यावेळी नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी साळुंखे, जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे, जेष्ठ नेते उध्दवराव माळी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष संगीताताई गवळी, पंचायत समिती गटनेते संजू तात्या पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, नगरसेवक चिराग शेख, भास्कर पाटील, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, पंचायत समिती माजी सभापती दिनेश भाऊ बोरसे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष पैलवान, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबेळकर, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितू वाघ, योगेश खंडेलवाल, माजी पंचायत समिती सदस्य जगनआप्पा महाजन, तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, राकेश बोरसे, शिक्षक आघाडी विजय कदम सर, सदानंदभाऊ चौधरी, माजी नगरसेवक निलेश महाराज, किशोर रणधीर, सौरभ पाटील, कैलास नाना पाटील, जगदीश सूर्यवंशी, तुषार बोत्रे, प्रवीण मराठे, भाविक पटेल, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी केले. तर सूत्रसंचालन शहर सरचिटणीस अमोल नानकर यांनी केले. व आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे यांनी केले.

Protected Content