अमळनेर प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत लिफ्ट(उदवाहक) चे लोकार्पण नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर नगरपरिषदेच्या इमारतीत लिफ्टच्या सोयीमुळे शहरातील जनतेला व नगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना आता इमारतीत ये जा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने नगरपरिषदेने हे काम हाती घेतलेले होते.लिफ्ट च्या उदघाटनावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,नगरसेवक मनोज पाटील,तसेच मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.