Home Cities अमळनेर अमळनेर सह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : मागणी

अमळनेर सह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : मागणी

0
216


अमळनेर : जळगाव जिल्हयासह अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा आले की, जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्‌यात पेरण्या झाल्या होत्या . परंतु ,तेव्हाही पावसाचा खंड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणी कराव्या लागल्या. त्यानतर जुलै महिन्याच्या तिस-या आठवडा नंतर परत पावसाचा 22 दिवसाचा खंड संपुर्ण तालुक्यात पडला. यामुळे मुग, उडीद, सोयाबीन, मका ही पीके वाया गेली. त्यानतंर ऑगस्ट महिन्याच्या तिस-या आठवड्यानंतर सप्टेबर महिन्याच्या शेवट पर्यंत सतत पाऊस आला. यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. कापसावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. तरी आज तालुक्यात जिल्हयात खरीप हंगाम पूर्ण वाया गेलेला आहे. तरी शासनाने सपूर्ण अमळनेर तालुका व जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतक-याना आर्थिक मदत ‌करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर कार्याध्यक्ष सुभाष पाटील, सुरेश पाटील, दिनेश पवार, राजीव पाटील, श्रीधर चौधरी, देवेंद्र पाटील, राहुल भालेराव, परवेज पठाण आदींच्या साह्य आहेत.


Protected Content

Play sound