भुसावळ प्रतिनिधी । कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आहे, त्यामुळे काही छोट्या व्यवसायिकांना अनुदान जाहीर केले परंतू टेन्ट व्यवसायिकांसाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या टेन्ट व्यवसायिकांना विशेष पॅकेज जाहीर करावे अन्यथा कामगार दिनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात टेंट व्यावसायिकांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने याना आज निवेदन दिले. यात नमूद करण्यात आले की, कोविड – १९ चा मुकाबला करण्यासाठी मागील वर्षी मार्च मध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाउनमुळे लग्न समारंभात काम करणाच्या टेन्ट हाउस, बॅजो व कॅन्टीन कामगारसह मालकांवर फारमोठा आघात करणारा ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरून सर्व आपल्या रोजगारांच्या प्रतीक्षेत असताना परत लॉकडाऊन लागल्याने दुसऱ्या कोविड लाटेत राज्य शासनाने कोणतेही आर्थिक पॅकेजची घोषणा नाकारली. टेन्ट व्यवसायिकांना उघड्यावर टाकून बेवारस सोडले आहे. शासनाने त्वरीत टेंट व्यावसायिकांना निर्वाह भत्त्यासह विशेष पैकेजची व्यवस्था करावी अन्यथा १ मेस कामगार दिनी शासकीय ध्वजारोहण प्रसंगी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर किशोर भालेराव, प्रवीण माळी, किरण मिस्तरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.