गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबर रोजी निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) धुळे न्यायालयाने दिलेल्या घरकुल घोटाळ्याच्या निकालाविरुद्ध १२ आरोपींनी खंडपीठात जामीन अर्ज केला होता. त्यानुसार आज माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या सुनवाई झाली नसल्याचे कळते. परंतू पुढील तारीख १६ सप्टेंबर देण्यात आली असून त्याच दिवशी जामीनावर निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.

 

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वांचे जमीन अर्ज मंजूर होणार अशी अपेक्षा होती. परंतु आज प्राथमिक सुनवाई पार पडली नाही. कोर्टात नेमके काय झाले याची विस्तृत माहिती अद्याप मिळू शकली नाही. परंतू पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे कळते. कारण उर्वरित आरोपींच्या जामीन अर्जावरही १६ सप्टेंबर रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या जामीन अर्जावर एकाच वेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. घरकुल घोटाळ्यात सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे, साधना कोगटा, सुभद्राबाई नाईक, अलका लढ्ढा, सदाशिव ढेकळे, मीना वाणी, सुनंदा चांदेकर, डिंगबर पाटील, भगत बालाणी, दत्तू काेळी, कैलास साेनवणे यांच्यासह एकूण २१ ते २२ आरोपींनी मंगळवारी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत.

Protected Content