यावल प्रतिनिधी- येथील आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन शासनाच्या वतीने अनुदानीत योजने अंतर्गत ट्रॅक्टर आणी विविध शेती औजारे मिळवुन देण्याच्या नांवाखाली आमीष दाखवुन २ लाख ७० हजार रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार यावल येथे घडला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रा कंडुन मिळालेली माहीती अशी की , प्रकाश दोधु कोळी (वय ५० वर्ष व्यवसाय शेतकरी रा . भोलाणे ता . जि .जळगाव ह .मु.पिंप्री तालुका यावल) यांना संशयीत आरोपी तुकाराम सुभाष सपकाळे ( राहणार बोरावल ता . यावल) व परसाडे येथील राहणारे सलीम सिकंदर तडवी आणी शब्बीर नामदार तडवी यांनी दिनांक १० / ७ / २०१७ते १८ / ९ / २०१७दरम्यान वेळोवेळी यावल शहरातील पारिसतील विविध सार्वजनिक ठीकाणी यातील संशयीत आरोपी शब्बीर नामदार तडवी हा आदीवासी प्रकल्प कार्यालयात साहेब आहे असे भासवले.
या माध्यमातून आदिवासी प्रकल्प विभागाच्या माध्यमातुन शासनाच्या अनुदानीत तत्वावर ट्रॅक्टर , टेलर , नागर , रोटर अशी शेती उपयोगी सामग्री मिळवुन देण्याचे आमीष दाखवुन वेळोवेळी फसवणुक करून २ लाख७० हजार रुपये घेतले. मात्र बऱ्याच कालावधी नंतर शेती साहीत्य न मिळाल्याने फिर्यादी प्रकाश कोळी यांनी वारंवार आरोपींना दिलेले पैसे परत मागीतले असता उडवाउडवीची उत्तर मिळाली. यातील संशयीत आरोपी शब्बीर तडवी यांने ३५ हजार रुपये परत केले असुन , उर्वरीत २ लाख३५ हजार रुपये मिळाले नसल्याने आपली या तिघांनी मिळवुन फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने या तिघांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५ गु .र .न .१५९ ‘ २०२oभादवी ४२० , ४०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी असलम रवान हे करीत आहेत.