लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये बलात्कारानंतर जिवंत जाळलेल्या युवतीचा अखेर उपचारांदरम्यान, मृत्यू झाला आहे. दरम्यान, तरुणीचा मृतदेह चितेवर ठेवता बरोबर आई वडिलांनी तिला मिठी मारत केलेला आक्रोश मनहेलावून सोडणारा होता.
फतेहपूरमध्ये राहणाऱ्या संबंधित तरुणीवर दोन दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर आरोपीने तिला जिवंत जाळण्यात आले होते. तिच्यावर कानपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी तिचे उपचारांदरम्यान निधन झाले होते. पीडितेचा मृतदेह घरी आणण्याऐवजी थेट स्मशानात नेण्यात आला होता. जेव्हा तरुणीचं पार्थिव चितेवर ठेवण्यात आले, तेव्हा आई वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्याही अश्रूचा बांध फुटला होता. मुलीला अखेरचा निरोप देताना तिच्या आई-वडिलांची रडून-रडून वाईट स्थिती झाली होती. तिचं पार्थिव चितेवर ठेवताच आई वडिलांनी तिला गच्च मिठी मारली होती.