अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । आमदार छगन भुजबळ यांना दोन दिवसांपुर्वी मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आता बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा यांचा जीवेठा मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी स्थानिक राजापेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर धमकी देणाऱ्या अर्जून लोखंडे या तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, महाराष्ट्रात फिरणे बंद कर, नाहीतर संपवून टाकू : बडनेरा मतदार संघाचे आमदार रवि राणा यांना त्यांच्या मोबाईलवर संभाजीनगर येथील अर्जुन लोखंडे याने मोबाईल नंबरवरून धमकी दिली आहे. तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर तुझ्या जीवाचे काहीतरी करून टाकु, अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको. तुझ्यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हमला करणार आहे. तुला आम्ही सोडणार नाही, तुझ्या अमरावती येथे येऊन तुला दाखवून देतो की आमच्या विरोधात कसा काय बोलतो तू. एवढ्या वेळेस थांबत नाही तर तुला संपवून टाकतो, या सारख्या जीवे मारण्याच्या धमक्या देऊन अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे.