
जळगाव प्रतिनिधी | येथील रेल्वेस्थानकावरिल प्लॅटफॉर्मवर एका महिलेचा आज सकाळी अकस्मात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग रेल्वे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्वताबाई मनोहर दंडाणे (वय 37, रामपेठ, वरणगाव ता. भुसावळ) हे आपला पती मनोहर दंडाणे यांच्यासह रेल्वे प्लॅटफॉर्मवर मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयासमोर पार्वताबाई यांचा आकस्मात मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर आणि योगेश चौधरी करीत आहे.