राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात जखमीचा मृत्यू

नशिराबाद  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगात असलेली कार दुभाजकावर आदळून कारमधील तिघे जखमी झाल्याची घटना सोमवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद येथील मुंजोबा मंदीराजवळ घडली होती. या अपघातील जखमी राजेश पाटील यंचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता कारचालकाविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील युगल प्रकाश भोई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, युगल भोई, पिंतांबर विजय कुंभार, चेतन पाटील व राजेश पाटल हे (एमएच ४३ एएफ १७२२) क्रमांकाच्या कारने सोमवारी १४ नोव्हेबर रोजी जात होते. दरम्यान, कार ही नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरून मुंजोबा मंदिरासमोरून  दुपारी ४ वाजेच्या सुमारास जात असतांना ती दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील चौघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यातील जखमी राजेश पाटील यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता कारचालक पितांबर विजय कुंभार रा. नशिराबाद यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल मोरे हे करीत आहे.

 

Protected Content